किल्ले धारूर आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक भारत कोमटवार यांचा सेवानिवृत्त
किल्ले धारूर आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक भारत कोमटवार यांचा सेवानिवृत्त
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर, दि. ३० डिसेंबर: धारूर आगारातील सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक म्हणून अनेक वर्षे सेवा बजावलेले भारत कोमटवार हे ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने आगारात आज एक भावुक निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
धारूरचे सुपुत्र भारत कोमटवार यांनी मागील ३५ वर्षांपासून विविध पदांवर कार्यरत राहून आपली कर्तव्यदक्षता सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, ते काही काळ आगारप्रमुख म्हणूनही कार्यरत होते आणि त्यांच्या काळात आगारात अनेक विकासकामे झाली.
आजच्या निरोप समारंभात आगारप्रमुख नवनाथ चौरे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कोमटवार यांचा आणि त्यांच्या पत्नीचा सत्कार करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कोमटवार यांच्या निवृत्तीनंतर आगारात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या योगदानाबद्दल आगार प्रशासन आणि सर्व कर्मचारी त्यांचे आभार मानतात.
यावेळी उपस्थित होते: नवनाथ चौरे (आगारप्रमुख), बालाजी भिक्कड़, इम्रान कादरी, किरण चौधरी, अजय सोनटक्के, सिद्धार्त वाघमारे आणि इतर कर्मचारीमोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment