धारूर न्यायालय परिसरात हाणामारी; पत्रकारावर हल्ला, न्यायालयात खळबळ
धारूर न्यायालय परिसरात हाणामारी; पत्रकारावर हल्ला, न्यायालयात खळबळ
न्यायालयाच्या आवारात दोन गटांत तुंबळ हाणामारी, पत्रकार जखमी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल,
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर: १० मार्च रोजी किल्ले धारूर न्यायालयाच्या आवारात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत पत्रकार शहाबाद पठाण यांच्यावर हल्ला झाला असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. न्यायालयाच्या आवारात झालेल्या या हाणामारीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणीसाठी दोन गट आले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. पत्रकार शहाबाद पठाण हे घटनेचे चित्रीकरण करत होते, म्हणून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांना गंभीर दुखापत झाली असून, ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी आंबेजोगाई येथे पाठवण्यात आले आहे.
न्यायालयाच्या स्थापनेपासून प्रथमच आवारात हाणामारीची घटना घडली आहे.
या घटनेचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
युट्युब वर बातमीचा संदर्भ: युट्युब वरील बातम्यांच्या माध्यमातून या घटनेची माहिती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
Comments
Post a Comment