श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलची सयाजीराजे पार्कमध्ये धमाल सहल!
श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलची सयाजीराजे पार्कमध्ये धमाल सहल!
बोटिंग, स्विमिंग आणि ऐतिहासिक राहुटीचा अनुभव
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर, अकलूज येथे श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 1 मार्च रोजी सयाजीराजे पार्क, अकलूज येथे शैक्षणिक सहलीचा आनंद लुटला.
सकाळी 10:30 वाजता विद्यार्थ्यांना रुचकर अल्पोपहार देण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पाण्यातील बोटिंगचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांना बोट कशी चालवतात याची माहिती देण्यात आली आणि त्यांनी प्रत्यक्ष बोट चालवण्याचा अनुभव घेतला. स्विमिंग पूलमध्ये विद्यार्थ्यांनी मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतला. कारंजे, पाण्याच्या घसरगुंड्या आणि झोपाळ्यांवर विद्यार्थ्यांनी धमाल केली.
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी जुन्या काळातील राहुटी आणि त्यांचे सामाजिक जीवन कसे होते याचा अनुभव घेतला. तसेच सारस पक्षी आणि बदकांचे विविध प्रकार पाहिले. आगगाडीतून प्रवास आणि विविध झोपाळ्यांवर खेळण्याचा आनंद घेतला.
शाळेचे संचालक श्री. बाळासाहेब राठोड यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवले. शिक्षक, शिक्षिका, चालक आणि सेवक यांनीही सहकार्य केले.
शाळेच्या संचालिका राठोड मॅडम, मुख्याध्यापिका शेख मॅडम आणि सर्व शिक्षकांनी सहल यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. संचालक राठोड यांनी सर्वांचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment