किल्ले धारूर ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयात नववर्षाचे उत्साही स्वागत
किल्ले धारूर ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयात नववर्षाचे उत्साही स्वागत
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय आणि बालसंस्कार केंद्रात नववर्षाचे स्वागत अतिशय उल्हासपूर्ण वातावरणात करण्यात आले. विद्यालयातील 1 ली ते 7 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन "WEL~COME 2025" हे सुंदर नाव तयार केले. या कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक शेख शाहीद, मुंजाराम निरडे आणि रामराजा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षकवृंदाच्या परिश्रमातून नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले.
बालसंस्कार वर्गातील लहान मुलांनी सुंदर शुभेच्छा कार्ड तयार करून उत्साह वाढवला. नव्या वर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यालयातील मुख्याध्यापक शेख शाहीद यांनी यावेळी बोलताना विद्यार्थ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि नव्या वर्षात अधिकाधिक प्रगती करण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी प्रेरित केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या वर्षाची उत्सुकता वाढली आणि त्यांनी नव्या जोमाने नवीन वर्षाची सुरुवात केली.
Comments
Post a Comment