रौप्य महोत्सव: किल्ले धारूरच्या शिक्षण संस्थेत नवीन वर्षाची उज्ज्वल सुरुवात
रौप्य महोत्सव: किल्ले धारूरच्या शिक्षण संस्थेत नवीन वर्षाची उज्ज्वल सुरुवात
सुर्यकांत जगताप
किल्ले धरूर, (दिनांक 4 जानेवारी): कै. प. श्यामाप्रसाद मुखर्जी शिक्षण संस्था, किल्ले धारूर यांनी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त नवीन वर्षाचे स्वागत एका वेगळ्या पद्धतीने केले. संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष श्री सुमंत काका दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोनिमोहा येथील वसंतराव भागवत आश्रम शाळेत एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
शाळेच्या रौप्य वर्षामध्ये पदार्पण आणि नवीन वर्ष 2025 चे स्वागत या निमित्ताने ‘कृतज्ञता सोहळा व संकल्प सोहळा’ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेसाठी 25 वर्षांपासून परिश्रम घेणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या निमित्ताने येणारे 2025 वर्ष आणि पुढील काळात शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संदीप भैया खिलोजी, उपाध्यक्ष रुपेशजी चिद्रवार, सुमित डुबे, चेतन डुबे, सुरज डुबे, मुख्याध्यापक श्री कुलकर्णी सर, शाळेतील शिक्षक, बुरके सर, वट्टमवार सर, मुळे सर, प्रशांत सर, मुंडे सर, चव्हाण सर, कापसे सर, अविनाश सर, यादव सर तसेच वसतिगृह कर्मचारी. राऊत मामा,मनेरी ताई, सविता ताई, गंधारी ताई, गीता ताई,शाळेतील सर्व शिक्षक, वसतिगृह कर्मचारी, सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment