भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
( सुर्यकांत जगताप )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ. संभाजीनगर व मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ महाविद्यालय, "युथ फॉर माय भारत" आणि "युथ फॉर डिझीटल लिटरसी" या उपक्रमांच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनांच्या विशेष वार्षिक शिबीरात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदानाचे हे महत्त्वाचे शिबीर रविवार, दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी मौजे अंजनडोह, तालुक्यात किल्ले धारूर, जिल्हा बीड येथे आयोजित केले जाईल. या शिबीराचे मुख्य थीम असेल "रक्तदान जीवन दान".
उद्घाटन व प्रमुख उपस्थिती:
- प्रा.डॉ. एम.एन. गायकवाड – उपप्राचार्य, राजमाता जिजाऊ महाविद्यालय, धारूर
- प्रा.डॉ. डी.बी. जाधव – राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी
- मा. श्री. प्रमोद सोळंके – सरपंच, अंजनडोह
- प्रा. एम.ए. जोगडे – उपप्राचार्य, राजमाता जिजाऊ महाविद्यालय, धारूर
- प्रा.डॉ. व्ही.एस. कुंभारे – राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी
- मा. श्री. प्रकाश सोळंके – उपसरपंच, अंजनडोह
- डॉ. गोपाळ काकडे – प्राचार्य, राजमाता जिजाऊ महाविद्यालय, धारूर
- प्रा. बी.एस. जोगदंड – राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी
- मा. श्री. एस.एस. साखरे – ग्रामविकास अधिकारी, अंजनडोह
सर्व सन्माननीय ग्रामस्थ व जनतेने या महत्त्वाच्या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करून जीवनदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाला सहकार्य म्हणून रक्तपेढी स्वा.रा.ती. ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई यांच्या वतीने हजर राहणार आहे.
सर्वांनी या उपक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आले आहे!
Comments
Post a Comment