राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्ले धारूर वाचन संकल्प महाराष्ट्रातर्गत कार्यशाळेत डॉ. वृंदावनी गायकवाड यांचे मार्गदर्शन
वाचन संस्कारामुळे ज्ञानाचे भांडार समृद्ध होते : - ग्रंथपाल डॉ. वृंदावनी गायकवाड
किल्ले धारूर, ( सुर्यकांत जगताप )
7 जानेवारी - राजमाता जिजाऊ महाविद्यालयातील ग्रंथालय व माहिती केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना आणि प्रा. व्ही. आर. दाडगे फाउंडेशन लातूर यांच्या सहयोगाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत आझाद महाविद्यालय, औसा येथील ग्रंथपाल डॉ. वृंदावनी गायकवाड यांची ऑनलाइन झूम वाचन कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत अग्रणी वक्ते म्हणून बोलताना डॉ. गायकवाड यांनी मराठी भाषेल्या प्राप्त अभिजात भाषेचा दर्जा याबद्दल माहिती दिली. "या मान्यतेमुळे मराठी भाषेच्या समृद्धीसाठी शासनाकडून नवनवीन प्रयत्न होणार आहेत," असे ते म्हणाले.
त्यांनी वाचन संस्कृतीला महत्व देताना विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. वाचनामुळे ज्ञानाची भूक भागविता येते, असे नमूद करताना त्यांनी विविध साहित्य प्रकारांचा उल्लेख केला. "आज उपलब्ध असलेल्या कथा, कादंबरी, कविता, नाटक, आत्मचरित्र, चरित्र आणि ललित निबंध यांसारख्या विविध विषयांच्या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांनी वाचनाकडे जास्तीत जास्त वळावे," अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी वाचनाची प्रवृत्ती कमी होत असल्याचे दु:ख व्यक्त केले. "शासन स्तरावर वाचन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सक्रिय करणाऱ्या उपक्रमांकडे लक्ष देणे आवश्यक आहे," असे ते म्हणाले.
यावेळी उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सच्चिदानंद ढेपे, कार्यालय अधीक्षक श्री. केशव भोंडवे, आयक्यूएससी समन्वयक डॉ. एल. बी. जाधवर, कार्यक्रमाधिकारी प्रा. बालासाहेब जोगदंड, डॉ. विजयकुमार कुंभारे, डॉ. दत्ता जाधव व राष्ट्रीय सेवा योजनांचे स्वयंसेवक, विद्यार्थी प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय समन्वयक ग्रंथपाल श्री. गोपाळ सगर यांनी केला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. व्ही. आर. दाडगे लायब्ररी फाउंडेशनचे आजीव सदस्य ग्रंथपाल डॉ. गोविंद घोगरे यांनी आभार मानले.
यामुळे विद्यार्थ्यांना वाचन प्रक्रियेचे महत्त्व समजले असून, भविष्यात अधिक विद्यार्थी वाचनाकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
https://youtu.be/4WzVbGY0E1M?si=M1euQjCZHVEAGndP
Comments
Post a Comment