किल्लेधारुर तहसील कार्यालयात निराधार योजनेच्या लाभासाठी गेलेल्या 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू
किल्लेधारुर तहसील कार्यालयात निराधार योजनेच्या लाभासाठी गेलेल्या 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू
डीबीटी फॉर्म भरण्यासाठी गेल्या होत्या कमलबाई कसबे
सतत अपमानित होणाऱ्या निराधार लाभार्थ्यांचा जीव धोक्यात
सुर्यकांत जगताप
किल्ले
धारुर, दि. 27 मार्च 2025 - गेल्या काही महिन्यांपासून बंद पडलेली निराधार योजनेची पगार सुरु करण्यासाठी शहरातील आणि तालुक्यातील तहसील कार्यालयात डीबीटी फॉर्म भरण्यासाठी आलेल्या सत्तर वर्षीय वृद्ध महिलेचा तहसील कार्यालयात मृत्यू झाल्याची घटना आज दि. 27 मार्च गुरुवार रोजी घडली.कमलबाई बाबुराव कसबे (वय वर्षे 70 रा. मोहा जहागीर) या तहसील कार्यालयात डीबीटी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना तहसील कार्यालयातच उष्माघाताचा झटका आल्याची प्राथमिक माहिती मिळाली. उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेत असतानाच मृत्यूने त्यांना गाठले. तहसील कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना, श्रावणबाळ योजना आदींचे अनुदान रखडले आहे. ठराविक लाभार्थ्यांचे अनुदान मिळत असल्याने लाभापासून वंचित असलेले शेकडो वृद्ध, निराधार, अपंग लोक पुन्हा पुन्हा डीबीटी करण्यासाठी तहसील कार्यालयात येरझऱ्या मारत आहेत. सतत अपमानित होणाऱ्या निराधार लाभार्थ्यांचे आता जीव सुद्धा जात असल्याचे आजच्या घटनेवरून दिसून आले. या घटनेनंतर दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर काय कारवाई करण्यात येते याकडे लक्ष.