धारूरच्या शारदा इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या ज्योतीदेवी हजारी यांना 'बेस्ट प्रिन्सिपल'
धारूरच्या शारदा इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या ज्योतीदेवी हजारी यांना 'बेस्ट प्रिन्सिपल'
किरण बेदी आणि सायना नेहवाल यांच्या हस्ते मुंबईत सन्मान
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर - धारूर शहरातील शारदा इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या ज्योतीदेवी रुपेशसिंह हजारी यांना शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी 'बेस्ट प्रिन्सिपल' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी आयएएस अधिकारी किरण बेदी आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्या हस्ते मुंबईतील एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शारदा इंग्लिश स्कूलमध्ये नऊ वर्षांपासून प्राचार्य म्हणून कार्यरत असलेल्या ज्योतीदेवी हजारी यांनी शाळेत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. 'एक मूठ धान्य' या उपक्रमाद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांकडून धान्य गोळा करून गरजू लोकांना वाटले. व्हॅलेंटाईन डेला 'मातृ-पितृ दिन' साजरा करून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये पालकांबद्दल आदर निर्माण केला, तर 'ग्रँड पेरेंट्स डे'च्या माध्यमातून आजी-आजोबांचे महत्त्व अधोरेखित केले.
त्यांच्या या कार्याची दखल इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड या संस्थेने घेतली आणि त्यांना 'बेस्ट प्रिन्सिपल' पुरस्काराने गौरवले. संपूर्ण भारतातून 143 प्राचार्यांना हा पुरस्कार देण्यात आला, त्यापैकी ज्योतीदेवी हजारी यांची निवड झाली. यापूर्वीही त्यांना इंडियन सायन्स ऑलिम्पियाडने विशेष पुरस्कार देऊन गौरवले होते.
श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव रमेशराव आडसकर आणि संचालिका अर्चनाताई आडसकर यांनीही ज्योतीदेवी हजारी यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. हजारी कुटुंबीय आणि धारूर शहरात त्यांचे अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment