धनंजय कुलकर्णी यांच्या खांद्यावर धारूर तालुका अध्यक्षपदाची धुरा!
धनंजय कुलकर्णी यांच्या खांद्यावर धारूर तालुका अध्यक्षपदाची धुरा!
अखिल भारतीय पेशवा संघटनेची मोठी जबाबदारी, समाजाच्या हितासाठी कटिबद्ध.
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर: अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या धारूर तालुका अध्यक्षपदी धनंजय कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांच्या आदेशानुसार आणि बीड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि समाज बांधवांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
समाजातील विविध घटकांना एकत्र आणून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अखिल भारतीय पेशवा संघटना कार्यरत आहे. समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, सामान्य कुटुंबांना येणाऱ्या अडचणींवर न्याय मिळवून देणे, अशा विविध कार्यांमध्ये संघटना सक्रिय आहे.
९ मार्च २०२५ रोजी बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी धारूर येथील धनंजय कुलकर्णी यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन त्यांची तालुका अध्यक्षपदी निवड केली. यावेळी संघटनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष अभय जोशी, कार्याध्यक्ष सुधीर धर्माधिकारी, सरचिटणीस मिलिंद कुलकर्णी, अंबाजोगाई शहराध्यक्ष संतोष वडगावकर आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना धनंजय कुलकर्णी यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. तसेच, इतर समाजांना सोबत घेऊन सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment