धारुर तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत २५ मार्चला


धारुर तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत २५ मार्चला

तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण जाहीर

सुर्यकांत जगताप

किल्ले धारुर, दि. २४ : धारुर तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात होणार आहे. यासंदर्भातील माहिती तहसीलदार तथा राज्य निवडणूक प्राधिकृत अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या राजपत्रानुसार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेनुसार, धारुर तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यानुसार, अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमातीसाठी २, नागरिकांचा मागास प्रवर्ग १५ आणि खुला प्रवर्ग ३० जागा राखीव असतील.
आरक्षण सोडतीसाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
तहसीलदार कार्यालयात होणाऱ्या या आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे. या सोडतीनंतर, आगामी पाच वर्षांसाठी (सन २०२५ ते २०३०) धारुर तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाचे आरक्षण निश्चित होईल.

Comments

Popular posts from this blog

धारूर न्यायालय परिसरात हाणामारी; पत्रकारावर हल्ला, न्यायालयात खळबळ

अतिक्रमण हटवण्यावरून व्यापारी आणि नगरपरिषदेत मतभेद; रस्ता दुरुस्तीचे काम रखडण्याची शक्यता

श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलची सयाजीराजे पार्कमध्ये धमाल सहल!