किल्ले धारूर बस स्थानकात कचरा जाळल्याने आगीचा धोका; एसटी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
किल्ले धारूर बस स्थानकात कचरा जाळल्याने आगीचा धोका; एसटी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर: किल्ले धारूर बस स्थानकात १२ मार्च रोजी व्यापाऱ्यांनी दिवसभर व्यवसाय करून संध्याकाळी कचरा जाळल्याने आगीचा मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले धारूर बस स्थानकात दिवसभर व्यवसाय करणारे व्यापारी संध्याकाळी आपला कचरा बस स्थानकाच्या आवारातच जाळतात. १२ मार्च रोजीही व्यापाऱ्यांनी कचरा जाळला, त्यामुळे मोठी आग लागली. आगीमुळे मोठी हानी होण्याची शक्यता होती. मात्र, वेळीच एसटी महामंडळाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग विझवली. एसटी कर्मचाऱ्यांनी वेळीच लक्ष न दिल्यास मोठी हानी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
Comments
Post a Comment