धारूरमध्ये पेट्रोल व प्रदूषण विरहित ई-बाईक शोरूमचा शुभारंभ
किल्ले धारूरमध्ये पेट्रोल व प्रदूषण विरहित ई-बाईक शोरूमचा शुभारंभ
उद्योजक माधव निर्मळ आणि नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या हस्ते उद्घाटन
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर
धारूरमध्ये पेट्रोल आणि प्रदूषणमुक्त ई-बाईक शोरूमचा गुरुवारी (०८ मार्च २०२५) शुभारंभ झाला. या शोरूमचे उद्घाटन उद्योजक माधव निर्मळ आणि धारूरचे नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या हस्ते झाले.
ई-बाईकमुळे पेट्रोलचा खर्च वाचणार असून, केवळ सात ते दहा रुपयांमध्ये ६० ते १०० किलोमीटरचा प्रवास करता येणार आहे. सेंट्रल लॉकिंग सिस्टीम, जीपीएस, म्युझिक सिस्टीम, रिमोट कंट्रोल, मोबाईल कंट्रोल यांसारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये या ई-बाईकमध्ये आहेत.
धारूर येथील उद्योजक दिनेश मुसळे आणि राजेंद्र मुसळे यांनी माजलगाव, धारूर, वडवणी आणि परळी या चार तालुक्यांमध्ये शोरूम सुरू केले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना ई-बाईक खरेदी करणे सोपे झाले आहे.
शेतकरी, सरकारी कर्मचारी, विद्यार्थी आणि महिलांसाठी कमी किमतीत ई-बाईक उपलब्ध असून, प्रत्येक गाडीवर २० हजार रुपयांची सवलत देण्यात येत असल्याचे मुसळे बंधूंनी सांगितले.
या उद्घाटनाला उद्योजक माधव निर्मळ, नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी, राजमुद्रा सामाजिक संघटनेचे सुरेश शेळके, ॲड. मोहन भोसले, बाळासाहेब गायकवाड, नगरसेवक संजित कोमटवार, बाळू सोनटक्के, नाना चव्हाण, पत्रकार रोहित फावडे, नाथा चव्हाण, कैलास बोरगावकर, एम.डी. मोटर्सचे संचालक दिनेश मुसळे, अक्षय अंधारे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment