बीडच्या रेल्वे आणि आकाशवाणी प्रश्नांवर चर्चा; खा. सोनवणे यांना मराठवाडा जनता विकास परिषदेचे निवेदन
बीडच्या रेल्वे आणि आकाशवाणी प्रश्नांवर चर्चा; खा. सोनवणे यांना मराठवाडा जनता विकास परिषदेचे निवेदन
रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण, नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर
मराठवाडा जनता विकास परिषद शाखा- अंबाजोगाई, केज, धारूर यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील रेल्वे व आकाशवाणीच्या प्रश्नांसंदर्भात बीडचे खासदार मा. बजरंग बप्पा सोनवणे यांना 9 मार्च रोजी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
यावेळी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करणे, नवीन गाड्या सुरू करणे, स्थानकांवर सुविधा वाढवणे यांसारख्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच, आकाशवाणी केंद्राचे आधुनिकीकरण करणे, कार्यक्रमात वाढ करणे, स्थानिक कलाकारांना संधी देणे यांसारख्या मागण्या करण्यात आल्या.
खासदार सोनवणे यांनी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या मागण्या सकारात्मकपणे विचारात घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अंबाजोगाई शाखा अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, सचिव श्री. रमेश सोनवळकर, श्री. आनंद कर्नावट, श्री. राजू साळवी, विशाल जाजु, राजू मोरे, संतराम कराड, रुपेश देशमुख, अनिल महाजन, संतोष राजपंखे, सुनील कावळे,दिनेश कापसे, शिनगारे अतुल, विश्वआनंद तोष्णीवाल, हनुमंत घाडगे सर, रणजित मोरे, गोविंद टेकाळे, गदळे सर, मस्के सर आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment