सरपंच अमोल जगताप यांचा गौरव! पदमापाणी प्रतिष्ठानच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान
सरपंच अमोल जगताप यांचा गौरव! पदमापाणी प्रतिष्ठानच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान
सुर्यकांत जगताप
धारूर तालुक्यातील आदर्श आवरगाव गावातील विकासकामांचा धडाका आणि सामाजिक बांधिलकी जपणारे आदर्श सरपंच म्हणून ओळखले जाणारे अमोल सर्जेराव जगताप यांना बीड येथील प्रतिष्ठित पदमापाणी प्रतिष्ठानच्या वतीने मानाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या समर्पित कार्याची दखल घेत प्रतिष्ठानने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
पदमापाणी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीप तरकसे यांनी याबाबत माहिती दिली. येत्या ४ मे रोजी सकाळी ११.३० वाजता शहरातील नाट्यगृहात एका विशेष समारंभात सरपंच जगताप यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
सरपंच अमोल जगताप यांनी आपल्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. त्यांनी केवळ भौतिक विकास साधण्यावरच भर दिला नाही, तर सामाजिक सलोखा आणि लोकशाही मूल्यांची रुजवणूक करण्यासाठीही सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या याच कृतीशिल कार्याची दखल घेत पदमापाणी प्रतिष्ठानने त्यांना या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवडले आहे.
सामाजिक कार्याची जाण आणि संवैधानिक मूल्यांचा आदर ठेवून केलेल्या त्यांच्या कार्यामुळे ते केवळ आपल्या गावाचेच नव्हे, तर परिसरातील अनेक लोकांसाठी प्रेरणास्रोत ठरले आहेत. त्यांच्या या निवडीमुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असून, गावकऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. सरपंच अमोल जगताप यांच्या कार्याचा यथोचित सन्मान होत असल्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment