किट्टीअडगाव येथे डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्याकडून मदतीचा हात
किट्टीअडगाव येथे डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्याकडून मदतीचा हात
सुर्यकांत जगताप ( पत्रकार )
किल्ले धारूर : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगर अध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी आज दिनांक १७ मे २०२४ रोजी किट्टीअडगाव, ता. माजलगाव येथे कै. बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुलगी मोक्षदा आगे हिच्या नावे ७५ हजार रुपयांची एफडी करून त्याचे कागदपत्र कुटुंबीयांना सुपूर्द केले.
डॉ. हजारी यांनी आगे कुटुंबीयांना आवश्यकतेनुसार सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष संदीप काचरुमंडे, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष ॲड. मोहन भोसले, सोशल मीडिया संयोजक रोहनसिंह हजारी, नगरसेवक रूपेश चिद्रवार, नगरसेवक सुरेश लोके, मन की बात प्रमुख रामप्रभू मुंडे, अनुभव शेंडगे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment