किल्ले धारूरला 'हिरवागार' होण्यापासून वंचित ठेवणारी अनास्था!सैन्य बटालियन स्थलांतर, धारूरच्या पर्यावरणाची वाताहत: प्रशासन व नेत्यांच्या उदासीनतेचा फटका!
किल्ले धारूरला 'हिरवागार' होण्यापासून वंचित ठेवणारी अनास्था!
सैन्य बटालियन स्थलांतर, धारूरच्या पर्यावरणाची वाताहत: प्रशासन व नेत्यांच्या उदासीनतेचा फटका!
सुर्यकांत जगताप ( पत्रकार )
किल्ले धारूर तालुक्याला मिळालेल्या वन थर्टी सिक्स मिलिटरी बटालियनचे ७५ टक्के जवान संभाजीनगरला स्थलांतरित झाल्याने तालुक्यात 'झाडे लावा, झाडे वाढवा' या मोहिमेला मोठा फटका बसला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि नेतेमंडळींच्या उदासीनतेमुळे ही बटालियन पूर्ण क्षमतेने धारूरमध्ये स्थिरावू शकली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
प्राप्त माहितीनुसार, किल्ले धारूरला मिळालेल्या वन थर्टी सिक्स मिलिटरी बटालियनला दरवर्षी २०० हेक्टर गायरान जमीन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची होती. परंतु, त्यांना हवी ती जमीन उपलब्ध न झाल्यामुळे ७५ टक्के जवान संभाजीनगरला शिफ्ट झाले आहेत. यामुळे धारूर तालुक्याला 'हिरवागार' करण्याचे स्वप्न भंगले आहे, अशी भीती व्यक्त होत आहे.
किल्ले धारूर शहर आधीच मागासलेले आहे आणि त्यात नैसर्गिक पर्यावरणाला चालना देणारी ही संधी वाया गेल्याने पर्यटनालाही मोठा फटका बसणार आहे. शासनाकडून मिळालेली ही मदत स्वीकारता न येणे हे दुर्दैव आहे.
पुन्हा ही बटालियन धारूरमध्ये येण्यासाठी आणि पर्यावरणाचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व संबंधितांनी एकत्रितपणे आणि गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा, धारूर तालुका हिरवागार होण्यापासून कायमचा वंचित राहील.
Comments
Post a Comment