ज्ञानदीप गुरुकुलमध्ये आदर्श विद्यार्थ्यांचा गौरव; वाढदिवसाचाही आनंद!
विराजचा वाढदिवस आणि प्रा. चौरे यांचा सत्कार; शालेय साहित्याचे वाटप!
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर (प्रतिनिधी): येथील जीवन ज्ञानदीप गुरुकुलमध्ये स्व. चंद्रकलाबाई विष्णुपंत शिंदे यांच्या स्मरणार्थ आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आले. याच कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चि. विराज ज्ञानेश्वर शिंदे याचा १४ वा वाढदिवस आणि जीवनदीप गुरुकुलचे प्रा. रामकिसन चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.
जीवनदीप ज्ञानदीप गुरुकुलमध्ये शिक्षण, चांगली वर्तणूक, सहकाऱ्यांशी योग्य संवाद आणि गुरुकुलच्या नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविण्यात येते. यावर्षी इयत्ता नववीतील विद्यार्थी चि. संग्राम बाबाराव खाडे आणि विद्यार्थिनी कु. जयश्री गोरखराव घुले यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. त्यांना आर्थिक मदत, स्कूल बॅग, शालेय साहित्य आणि शालेय उपयोगी वस्तूंची किट देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष बाब म्हणजे, कु. जयश्रीच्या दहावी बोर्ड परीक्षेची फी देखील यावेळी संस्थेतर्फे देण्यात आली.
या प्रेरणादायी सोहळ्यासाठी आर्य समाजाचे ज्येष्ठ सोमनाथ अप्पा कांबळे, ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन, जीवनदीप ज्ञानदीप गुरुकुलचे प्राचार्य रामकिसन चौरे, ज्येष्ठ पत्रकार सय्यद शाकेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन शिनगारे, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अतुल शिनगारे, कायाकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, अनंत भोसले, गणेश सावंत, माजी नगरसेवक रुपेश चिद्रवार, व्ही.के. हिरो शोरूमचे सुरज कोमटवार, ॲड. मोहन जी भोसले, अशोक मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
माजी नगरसेवक रुपेश चिद्रवार यांनी प्राचार्य रामकिसन चौरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये नवीन गोष्टी शिकून उल्लेखनीय कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन यांनी प्रा. चौरे यांच्या कार्याचा गौरव करताना ते एक अविरत आणि समर्पित व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले. त्यांनी विराजला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रामकिसन चौरे यांनी केले.
स्व. चंद्रकलाबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेला हा आदर्श विद्यार्थी पुरस्कार निश्चितच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरेल आणि त्यांना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करेल. तसेच, वाढदिवसाच्या निमित्ताने झालेले शालेय साहित्य वाटप विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले. जीवनदीप गुरुकुलमध्ये शिक्षण आणि संस्कारांना महत्त्व दिले जाते, हे या कार्यक्रमातून दिसून आले.
Comments
Post a Comment