किल्ले धारूरमध्ये मिथुन भैया गायसमुद्रे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
किल्ले धारूरमध्ये मिथुन भैया गायसमुद्रे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
सुर्यकांत जगताप ( पत्रकार )
किल्ले धारूर: येथील लोकप्रिय युवा मिथुन भैया गायसमुद्रे यांचा १६ मे २०२५ रोजी धारूर शहर आणि तालुक्यात मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी धारूर शहरातील आणि तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनी मिथुन भैया यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
माजी नगराध्यक्ष लक्ष्मण सिरसाट, नगरसेवक सुधीर (तात्या) शिनगारे, नगरसेवक बाबासाहेब गायसमुद्रे, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेभाऊ सोनवणे, गोपाळपूरचे सरपंच अभिजीत वावळ, असोलाचे सरपंच कृष्णा भाटणकर, उद्योजक बंटी (भैया) गायसमुद्रे, आरपीआय तालुकाध्यक्ष आकाश गायसमुद्रे, भारिप शहर अध्यक्ष गजेन्द्र किर्दक, पंचायत समिती सदस्य गोपाळपूर संतोष गायकवाड, पंचायत समिती सदस्य गोपाळपूर राजेश गायकवाड, उद्योजक अजय (बबलू) भैया गायसमुद्रे, तडफदार नेते सचिन गायसमुद्रे, नितीन गायसमुद्रे, चटक गायसमुद्रे, अजय गायसमुद्रे, सोनू सिरसाट यांच्यासह धारूर शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यकर्ते या आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते.
मिथुन भैया गायसमुद्रे हे तरुण आणि उत्साही नेतृत्व म्हणून धारूर परिसरात ओळखले जातात. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यकर्त्यांनी आणि मित्रमंडळींनी एकत्र येत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला.
त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment