राजमाता जिजाऊ महाविद्यालयात पत्रकारांचा सत्कार, बाळशास्त्री जांभेकरांचे कार्य स्मरण
सत्कार, बाळशास्त्री जांभेकरांचे कार्य स्मरण
किल्ले धारूर ( सुर्यकांत जगताप )
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजमाता जिजाऊ महाविद्यालयात आज, 6 जानेवारी रोजी दर्पण दिनानिमित्त एक भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात धारूर शहर व परिसरातील विविध पत्रकारांना त्यांच्या कार्याबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले.
समारंभात दैनिक लोकमतचे वार्ताहर अनिल महाजन यांनी प्रमुख भाषण करताना बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. महाजन म्हणाले, "दर्पण या वृत्तपत्राने समाजाला जागृत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून शिक्षण प्रसार आणि अन्यायकारक राजवटीविरुद्ध जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे."
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी पत्रकारांचे स्वागत करताना सांगितले की, "पत्रकार समाजाचा आरसा आहेत. ते समाजातील विविध घटनांवर प्रकाश टाकून जनतेच्या बाहेर आणतात. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात होणाऱ्या बदलांमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत."
या समारंभात धारूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश काळे, अनिल महाजन, अतुल शिनगारे, संदिपान तोंडे, सय्यद शाखेर अली, सूर्यकांत जगताप, अतिक मोमीन, सचिन थोरात, राम शेळके, सुभाष साखरे, रवी गायसमुद्रे, दिनेश कापसे, धनंजय कुलकर्णी, सुनील तोंडे यांसारखे अनेक पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विठ्ठल केदारी यांनी केले, तर उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड यांनी समारंभाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानले.
Comments
Post a Comment