सर्पदंशाने दोन सख्ख्या भावंडांचा अंत: कोयाळ गावावर शोककळा


सर्पदंशाने दोन सख्ख्या भावंडांचा अंत: कोयाळ गावावर शोककळा

सुर्यकांत जगताप ( पत्रकार )

किल्ले धारूर: धारूर तालुक्यातील कोयाळ गावात एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. सर्पदंशामुळे एकाच कुटुंबातील सात वर्षांची कोमल आणि पाच वर्षांचा शिवम या सख्या भावंडांचा अकाली मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
२४ मे रोजी मध्यरात्री प्रदीप मधुकर मुंडे यांच्या घरी झोपेत असताना, साप त्यांच्या अंगावर आला आणि त्याने दोन्ही चिमुकल्यांना दंश केला. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच दोघांनीही प्राण सोडले.
या घटनेमुळे मुंडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दोन निष्पाप जीवांच्या या बळीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

किल्ले धारूर: आमदार सोळंके यांच्या उपस्थितीत विविध समस्यांवर लक्ष वेधले; तातडीने उपाययोजनांची मागणी

दिनांक १४ जुलै २०२५: धारूर शहरातील दारूची दुकाने आणि बार पूर्णपणे बंदराज्य सरकारच्या धोरणांविरोधात हॉटेल-रेस्टॉरंट आणि वाईन शॉप मालक संघटना आक्रमक

किल्ले धारूर नगरपरिषदेमार्फत उदय नगरमध्ये हनुमान मंदिरापासून अशोक खेपकर यांच्या घरापर्यंत सीसी रोडचे काम; निविदा प्रक्रिया सुरू