ग्रामीण रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिक त्रस्त; प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात रास्ता रोको
ग्रामीण रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिक त्रस्त; प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात रास्ता रोको किल्लेधारूर आणि वडवणी तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील नागरिकांचा बांधकाम विभाग व तहसील कार्यालयाला अल्टिमेटम; ४ एप्रिलपासून थेटेगव्हाण चौकात आंदोलनाचा सुरू सुर्यकांत जगताप किल्लेधारूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. वळण वस्ती येथील रस्त्याची अवस्था तर इतकी बिकट झाली आहे की, यावरून वाहने चालवणेही मोठे जिकिरीचे झाले आहे. रस्त्यात मोठे खड्डे पडल्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या गंभीर समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेतली नसल्याने धारूर आणि वडवणी तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील नागरिक आता आक्रमक झाले आहेत. बांधकाम विभाग आणि तहसील कार्यालयात अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी एकत्र येत ४ एप्रिल रोजी थेटेगव्हाण चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. धारूर-वडवणी मार्गा...