शिवशक्तीचा हुंकार! धारूरच्या महादुर्गातून पुन्हा गर्जणार 'जय भवानी, जय शिवाजी!'राज्याभिषेकाचा रणनाद! ३५२ व्या शिवतेजाच्या महाउत्सवासाठी बीडमध्ये क्रांतीची मशाल पेटणार!
शिवशक्तीचा हुंकार! धारूरच्या महादुर्गातून पुन्हा गर्जणार 'जय भवानी, जय शिवाजी!'
राज्याभिषेकाचा रणनाद! ३५२ व्या शिवतेजाच्या महाउत्सवासाठी बीडमध्ये क्रांतीची मशाल पेटणार!
सुर्यकांत जगताप ( पत्रकार )
किल्ले धारूर, : 'जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य' यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. शिवभक्तांसाठी एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी क्षण अनुभवण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. हा सोहळा जेष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके १९४६ रोजी सुरू होईल, जो दिनांक ०८ व ०९ जून २०२५ रोजी महादुर्ग धारूर, जि. बीड येथे संपन्न होईल.
गेल्या वर्षीच्या प्रचंड प्रतिसादानंतर, यंदाही जागर प्रतिष्ठानने हा भव्य दिव्य सोहळा आयोजित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करून, त्यांच्या आदर्श विचारांना उजाळा देण्यासाठी हा सोहळा एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल. सर्व शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा:
०८ जून २०२५ रविवार:
* सायं. ४ वा. - स्वच्छता मोहीम
* सायं. ५ वा. - छ. संभाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती
* सायं. ६ वा. - मदनी खेळ व लंगेश देवीचा गोंधळ
०९ जून २०२५ सोमवार:
* सकाळी ८ वा. - पालखी सोहळा
* सकाळी ९ वा. - श्री शिव राज्याभिषेक
* सकाळी १० वा. - पुरस्कार वितरण सोहळा
* सकाळी ११ वा. - महाप्रसाद होईल
या सोहळ्याचे आयोजक विशाल जाधव, संगम चाळक, अशोक आंगे आणि आदिनाथ शिंदे यांनी सर्व शिवप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
स्थळ: महादुर्ग धारूर, जि. बीड
Comments
Post a Comment