किल्ले धारूर किसान सभेचे धरणे स्थगित, सोयाबीन खरेदीबाबत सकारात्मक चर्चा
सुर्यकांत जगताप
धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदीबाबत उद्भवलेल्या वादावरून अखिल भारतीय किसान सभेने सुरू केलेले धरणे आंदोलन प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे.
खरेदी विक्री संघात शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करताना अनेक अटी व शर्ती लावल्या जात असल्याच्या तक्रारीनंतर किसान सभेने खरेदी विक्री संघ कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधून प्रशासक श्री ऋषिकेश कातळे यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक घेतली.
या बैठकीत कातळे यांनी आठ दिवसांमध्ये ग्रेडिंग मशीन आणून शेतकऱ्यांचे सोयाबीन यादीतील नावाप्रमाणे घेतले जाईल, असे आश्वासन दिले. तसेच, ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे, त्यांची गावांनुसार यादी तयार करून ती संबंधित ग्रामपंचायत कार्यालयासमोर लावण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

किसान सभेच्या तालुका सचिव कॉ. दादासाहेब सिरसट यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे धरणे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत किसान सभेचे तालुका अध्यक्ष कॉ. ॲड. संजय चोले, जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. काशीराम शिरसट, तालुका सचिव कॉ. दादासाहेब सिरसट, कॉ. मधुकर चव्हाण, कॉ. सूर्यभान रिडे, सीटू संघटनेचे जिल्हा सचिव कॉ. डॉ. अशोक थोरात हे उपस्थित होते.
Comments
Post a Comment