साईराम अर्बन बँकेवरील फसवणुकीचा आरोप सिद्ध, संचालक मंडळावर गुन्हा दाखल


साईराम अर्बन बँकेवरील फसवणुकीचा आरोप सिद्ध, संचालक मंडळावर गुन्हा दाखल


सुर्यकांत जगताप ( प्रतिनिधी ) किल्ले धारूर येथील साईराम अर्बन बँकेच्या खातेधारकांचा आरोप सिद्ध झाला आहे. बँकेच्या संचालक मंडळावर खातेधारकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालय केज यांनी दिले आहेत.

सुहास मोरलवार आणि अभिमन्यू काळे या खातेधारकांनी बँकेत एकूण 18 लाख 78 हजार 541 रुपये जमा केले होते. मात्र, बँकेकडून पैसे परत मिळाले नाहीत. यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर सुनावणी घेऊन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय केजचे न्यायाधीश के. डी. जाधव यांनी साईराम अर्बन बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आणि शाखेच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 420, 409, 465, 467 आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

या निकालानंतर याचिकाकर्ते सुहास मोरलवार आणि अभिमन्यू काळे यांनी समाधान व्यक्त केले आहे. याचिकेची पैरवी ॲड. ए.एस. साखरे यांनी केली असून त्यांना ॲड. एल. व्ही. गायकवाड आणि ॲड. एस. ए. शेख यांनी सहकार्य केले.


Comments

Popular posts from this blog

किल्ले धारुर शहरातील व्यापारी संघटनेने मेन रोडची दुरुस्ती करण्याची मागणी

अंजनडोह: जलजीवन मिशन अधूरं, ग्रामपंचायतचा उपोषणाचा इशारा