सोशल मीडियाचा दुरुपयोग करणाऱ्यांना जेलची हवा खावी लागेल: पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे
सोशल मीडियाचा दुरुपयोग करणाऱ्यांना जेलची हवा खावी लागेल: पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर: सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी करण्याचे आवाहन धारूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी केले आहे. वादग्रस्त पोस्ट वायरल करून दोन समाजात वाद निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली धारूर पोलिसांनी सोशल मीडियाचा दुरुपयोग रोखण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर करू नये. अशा पोस्टमुळे समाजात फूट पडण्याची शक्यता असते.
त्याचबरोबर, शस्त्रांचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणे, मारामारी किंवा शिवीगाळीचे व्हिडिओ शेअर करणे यासारख्या कृतींवरही बंदी घालण्यात आली आहे. अशा पोस्ट करणाऱ्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियाचा वापर करून समाजात सद्भावना पसरवावी. सकारात्मक गोष्टी शेअर करून समाजाचे कल्याण करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
Comments
Post a Comment