सोनीमोहा येथे बालसभेत मुलींसाठी स्वच्छतागृह बांधण्याची घोषणा
सोनीमोहा येथे बालसभेत मुलींसाठी स्वच्छतागृह बांधण्याची घोषणा
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर: आंबेवडगाव तालुक्यातील सोनीमोहा येथील जि.प. प्राथमिक शाळेत दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी आयोजित बालसभेत एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. या बालसभेत बोलताना सरपंच राहुल भैया तोंडे यांनी सोनीमोहा जिल्हा परिषद शाळेसाठी 2025 च्या आराखड्यात मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याची मंजूरी दिली आहे, असे जाहीर केले.
या बालसभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीराम सिकची सर यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालसभांचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन शिक्षक निर्मळ सर यांनी मानले.
सरपंचांची घोषणा: मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहसरपंच राहुल भैया तोंडे यांनी बालसभेत बोलताना शाळेतील मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याच्या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुलींचे शिक्षण आणि त्यांचा सर्वांगीण विकास यासाठी स्वच्छतागृह ही एक मूलभूत गरज आहे.
बालसभेचे उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे. विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांशी सहकार्य करण्याची भावना निर्माण करणे.शाळेतील शैक्षणिक वातावरणात सुधारणा करणे. शाळेतील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे.
Comments
Post a Comment