किल्ले धारूर तालुक्यात उत्साहात साजरी झाली वेळ अमावस्या
किल्ले धारूर तालुक्यात उत्साहात साजरी झाली वेळ अमावस्या
( सुर्यकांत जगताप )
किल्ले धारूर तालुक्यात 30 डिसेंबर 2024 रोजी पारंपरिक पद्धतीने वेळ अमावस्या साजरी करण्यात आली. या दिवशी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात जाऊन काळी जमिनीची पूजा करून चांगल्या पिकांची प्रार्थना केली.
वेळ अमावस्या हा मराठवाड्यातील शेतकरी समाजाचा खास सण असून, या दिवशी शेतकरी आपल्या कुटुंब व मित्रमंडळींसह एकत्र येऊन भोजन करतात. यावेळी बाजरी व ज्वारीचे उंडे, भाजी, खीर, दही, धपाटे, अंबील असे पारंपरिक पदार्थ बनवून खाण्याची प्रथा आहे.
या वर्षीही धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या सणाची मोठ्या उत्साहात साजरी केली. शेतकऱ्यांनी रानातील बोरे पेरू, ऊस यांचा आस्वाद घेतला. यावेळी मित्रपरिवार व नातेवाईकांसह रानात भोजन करण्याची परंपराही जोपासण्यात आली.
वेळ अमावस्या हा केवळ एक धार्मिक विधी नसून, तर कृषी आणि सामाजिक बंधनांचे एक सुंदर संगम आहे. या सणाच्या निमित्ताने शेतकरी आपल्या परंपरांचे जतन करतात आणि एकमेकांशी नातेसंबंध मजबूत करतात.
Comments
Post a Comment