धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान श्री.भैरवनाथ सोळंके यांची धारूर तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान श्री.भैरवनाथ सोळंके यांची धारूर तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर: धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा, महाराष्ट्र राज्य या संस्थेने धारूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष म्हणून श्री. भैरवनाथ गंगाराम सोळंके यांची नियुक्ती केली आहे.
श्री. सोळंके हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून, आपल्या भागातील विकासासाठी निष्ठेने काम करत आहेत. त्यांच्या या समाजसेवेची दखल घेऊन प्रतिष्ठाने त्यांना ही जबाबदारी सोपवली आहे.
श्री. सोळंके यांनी आपल्या विभागात संघटनेच्या माध्यमातून समाजसेवेचे काम जोमाने करावे, अशी अपेक्षा प्रतिष्ठानने व्यक्त केली आहे. त्यांची ही नियुक्ती तालुक्यातील सामाजिक कार्याला नवीन ऊर्जा देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा, महाराष्ट्र राज्य ही संस्था छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचे प्रसार करण्यासाठी आणि समाजसेवेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी काम करते.
श्री. सोळंके यांचे अभिनंदन
श्री. भैरवनाथ गंगाराम सोळंके यांच्या या नियुक्तीवर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. बाळराजे आवारे पाटील यांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे. सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment