मसाजोग येथील सरपंच हत्येच्या निषेधार्थ किल्ले धारूरमध्ये 3 जानेवारी कॅन्डल मोर्चा
मसाजोग येथील सरपंच हत्येच्या निषेधार्थ किल्ले धारूरमध्ये 3 जानेवारी कॅन्डल मोर्चा
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर, दि. ३ जानेवारी रोजी मसाजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची निर्घुण हत्या झाल्याने संपूर्ण परिसर हळहळून गेला आहे. या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना कठोर शिक्षा होण्याची मागणी करत किल्ले धारूर येथे शुक्रवारी कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे.
हा कॅन्डल मार्च धारेश्वर मंदिरातून सुरू होऊन काशिनाथ चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपला. यावेळी स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येणार.
"संतोष अण्णा देशमुख हे एक निष्ठावान आणि जनसेवक होते. त्यांच्या हत्येमागे राजकीय साजिश असल्याचा संशय आहे. सरकारने या प्रकरणाचा सखोल तपास करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची गरज आहे."
या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी व्हावे.
Comments
Post a Comment