राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये माय भारत आऊट्रीच प्रोग्राम अंतर्गत कार्यशाळा संपन्न.
किल्ले धारूर ( सुर्यकांत जगताप )
१० जानेवारी २०२५ - राजमाता जिजाऊ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) अंतर्गत 'माय भारत आऊट्रीच प्रोग्राम' विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी केले. प्रमुख उपस्थितीमध्ये उपप्राचार्य प्रा. एम. ए. जोगडे आणि उपप्राचार्य मेजर डॉ. एम. एन. गायकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक व सूत्रसंचालनाचे काम कार्यक्रमाधिकारी डॉ. बी. एस. जोगदंड यांनी केले. त्यांनी कार्यशाळेची रूपरेषा सहभागी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. 'माय भारत आऊट्रीच प्रोग्राम' कार्यशाळेत बीए, बीकॉम आणि बीएससी प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यशाळा ८ जानेवारी रोजी प्रारंभ झाली, जेथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी कुमारी पूजा लोकरेने माय भारत पोर्टलवर नोंदणी कशा पद्धतीने करायची यावर पावर पॉइंट प्रेझेंटेशन दिले. ९ जानेवारी २०२५ रोजी बीएस्सीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कुमारी प्रियांका गंभीरेने माय भारत पोर्टलवरील नोंदणीसाठीची प्रक्रिया समजावून सांगितली.
कार्यक्षमतेच्या तिसऱ्या दिवशी बीए प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना आदित्य शिरसाठ यांनी माय भारत पोर्टलवरील नाव नोंदणी प्रक्रिया सविस्तरपणे समजावून दिली आणि काही विद्यार्थ्यांची नोंदणी करून दाखवली.
कार्यशाळेच्या यशस्वी समारोपात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विजयकुमार कुंभारे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी डॉ. डी.बी. जाधव, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एल. बी. जाधवर, पर्यवेक्षक प्रा. सच्चिदानंद ढेपे, स्वयंसेवक, विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment