ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयात किल्ले धारूर सर्पविज्ञान कार्यशाळा
ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयात किल्ले धारूर सर्पविज्ञान कार्यशाळा
( सुर्यकांत जगताप )
किल्ले धारूर तालुक्यातील ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयात दिनांक 10 जानेवारी रोजी सर्पमित्र श्री निमेशजी चिद्रवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पविज्ञान कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष साप दाखवण्यात आले तसेच सापांच्या विविध प्रकारांविषयी माहिती देण्यात आली.
निमेशजी चिद्रवार सर यांनी विद्यार्थ्यांना विषारी आणि बिनविषारी साप, अंडे देणारे साप, व पिलांना जन्म देणारे साप याबद्दल सखोल माहिती दिली. त्यांनी परिसरातील साध्या सापांच्या जीवशास्त्रावर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांना साप पकडण्यासाठी लागणारे साहित्य दाखवले.
श्री चिद्रवार सर यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीवांना जीवनदान देण्याचे महत्त्व सांगितले आणि त्याबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन केले. यावेळी अनिल महाजन, शैला महाजन मॅडम, शेख सर, सर्व शिक्षक वृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment