मौजे रूई धारूर गावातील ग्रामस्थांनी एकत्रित केली एक लाख रुपयांची मदत
मौजे रूई धारूर गावातील ग्रामस्थांनी एकत्रित केली एक लाख रुपयांची मदत
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर तालुक्यातील मौजे रूई धारूर गावातील ग्रामस्थांनी एकजुटीचा दाखवात एक लाख पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये (रु. १,०५,५५०/-) ही रक्कम जमा केली आहे. ही रक्कम गावातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी स्वेच्छेने दिली आहे.
गावकऱ्यांनी जमा केलेली ही रक्कम धनादेश (चेक) स्वरूपात श्रीमती अश्विनीताई संतोष देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे.
गावकऱ्यांच्या या उदार भावनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment