बी.एड. प्रवेशासाठी राजमाता जिजाऊ महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन शिबिर
बी.एड. प्रवेशासाठी राजमाता जिजाऊ महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन शिबिर
( सुर्यकांत जगताप )
किल्ले धारूर – बी.ए., बी.एससी., बी.कॉम तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी बी.एड. प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शन व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघातर्फे करण्यात आले आहे.
या विशेष प्रशिक्षण वर्गात बी.एड. प्रवेश प्रक्रिया, ऑनलाइन अर्ज भरायची पद्धत, बी.एड. सीईटी परीक्षेची तयारी, तसेच आवश्यक कागदपत्रे आणि महत्त्वाच्या तारखांबाबत सविस्तर मार्गदर्शन दिले जाणार आहे.
हा प्रशिक्षण वर्ग 25 जानेवारी 2025 पासून सुरू होणार असून, 21 दिवस मोफत चालणार आहे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी समन्वयक डॉ. नितीन कुंभार हे मार्गदर्शन करणार आहे
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल काकडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, महाविद्यालयातील सर्व माजी विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, तसेच इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करून प्रवेश घ्यावा, असे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment