किल्ले धारुर शहरातील मेन रोडचे दुरुस्तीकरण: व्यावसायिकांचा आंदोलनाचा इशारा



किल्ले धारुर शहरातील मेन रोडचे दुरुस्तीकरण: व्यावसायिकांचा आंदोलनाचा इशारा

( सुर्यकांत जगताप )

किल्ले धारुर: धारुर शहरातील मेन रोडचे दुरुस्तीकरण करण्यात न आल्यास व्यापारी वर्गाने मार्केट बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला आहे. व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना 24 जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनात उल्लेख केला आहे की, मागील अनेक वर्षांपासून मेन रोड पूर्णतः खराब झालेले आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड, माती आणि अन्य अपशिष्ट साचलेले आहे, ज्यामुळे व्यावसायिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

निवेदनात म्हटले आहे की, छञपती शिवाजी महाराज चौक ते काशिनाथ चौक या बीचमधील रस्त्यावरून साधी मोटारसायकल गेल्यावर धुळीचे मोठमोठे लोट उभे राहतात. ही धूल वारंवार दुकानदारांच्या मालावर व खाद्यपदार्थांवर जाऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करते. यामुळे अनेक व्यापारी श्वसनासंबंधी आजारांना बळी पडल्याचा आरोप करण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबांचाही विचार करावा लागतो.

व्यापारी संघटनेने अनेक वेळा तोंडी व लेखी स्वरूपात नगर परिषदेस तोंड तोंड उभे राहून या समस्यांविषयी जागरूक केले आहे, परंतु अद्याप एका ठोस उपाययोजनेची प्रतिक्षा असून, कोणतीही कार्यवाही झाली नाही.

व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे कर्तव्यात लवकरात लवकर कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. अन्यथा, 14 फेब्रुवारी 2025 रोजी मार्केट बंद करण्याचा आणि कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

योग्य कृती न झाल्यास धारुर शहरातील व्यापारी वर्ग याबाबतीत मार्केट बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला आहे.अशी माहिती निवेदनात दिली आहे.

या निवेदनावर व्यापारी संघटनेच्या अनेक सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, ज्या मध्येव्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव, मदन धोत्रे, मयूर सावंत, यशवंत गायके, निलेश दुबे, कृष्णा भावठनकर, नितीन जाधव, अमर महामुनी, धीरज चिंचाळकर, सचिन संक्राते, शिवाजीराव ढगे, बाळू गुळवे, भरत शिंनगारे, रामजी तोष्णीवाल, महेश चिद्रावार, सिद्दिकभाई तांबोळी यांचा समावेश आहे.

माहितीस्तव:
- मा.आ.श्री.प्रकाशदादा सोळंके साहेब, माजलगांव मतदार संघ
- मा.खा.श्री.बजरंग (बप्पा) सोनवणे साहेब, बीड लोकसभा
- मा. जिल्हाधिकारी साहेब, बीड

व्यापारी संघटनेची एकता आणि संघर्ष करण्याची तयारी ही शहरातील विकासाची एक खूण आहे. प्रशासनाने लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यावसायिक वर्गाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

किल्ले धारुर शहरातील व्यापारी संघटनेने मेन रोडची दुरुस्ती करण्याची मागणी

अंजनडोह: जलजीवन मिशन अधूरं, ग्रामपंचायतचा उपोषणाचा इशारा

साईराम अर्बन बँकेवरील फसवणुकीचा आरोप सिद्ध, संचालक मंडळावर गुन्हा दाखल