किल्लेधारूर शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुधारण्यासाठी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा


किल्लेधारूर शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुधारण्यासाठी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा

( सुर्यकांत जगताप )

किल्लेधारूर येथील चिंचपुर रोडच्या शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन शेती पंपाच्या विद्युत पुरवठ्याच्या सुरळिततेसाठी निवेदन दिले आहे. त्यांच्या मागण्या अनकडून गंभीरपणे घेतल्या नाहीत, त्यामुळे १६ जानेवारी रोजी पुन्हा निवेदन देऊन २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

शेतकऱ्यांनी तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरणच्या कार्यालयात आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

किल्लेधारूरच्या शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत असल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिके शेवटच्या टप्प्यात आली असताना मिळणाऱ्या पाण्याच्या अभावी पिके सुकत चालली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढत आहे. त्यांनी विद्युतीय सेवेसाठी अनेकवेळा तोंडी व लिखित निवेदने दिली, परंतु त्यावर काही कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला आहे.

महावितरण कार्यालयात दिलेल्या निवेदनात, २६ जानेवारी पर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास सर्व शेतकरी आत्मदहन करण्याची तयारी दर्शवली आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांमध्ये पप्पू तिवारी, साहेबराव शिनगारे, कुलदीप दरेकर, अण्णासाहेब शिनगारे, रोहितसिंह हजारी, दत्ता गोरे, सुरेश शिनगारे, अण्णासाहेब गोन्ने, दीपक वडगावकर, वसंत गोरे यांसारखे शेतकरी होते.

Comments

Popular posts from this blog

धारूर न्यायालय परिसरात हाणामारी; पत्रकारावर हल्ला, न्यायालयात खळबळ

अतिक्रमण हटवण्यावरून व्यापारी आणि नगरपरिषदेत मतभेद; रस्ता दुरुस्तीचे काम रखडण्याची शक्यता

श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलची सयाजीराजे पार्कमध्ये धमाल सहल!