जि.प. प्राथमिक शाळा, सोनीमोहा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
जि.प. प्राथमिक शाळा, सोनीमोहा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर: (दिनांक ३ जानेवारी) जि.प. प्राथमिक शाळा, सोनीमोहा केंद्र, आंबेवडगाव येथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम सिकची सर आणि सर्व शिक्षक-कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात मुख्याध्यापक सिकची सर यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवन आणि कार्याबद्दल मार्मिक भाषण केले. त्यांनी सावित्रीबाईंच्या समाज सुधारणेतील योगदानाची प्रशंसा करीत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.
सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करीत सिकची सर यांनी मुलींना शिक्षण घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, शिक्षण हाच मुलींच्या सक्षमीकरणाचा मार्ग आहे.
Comments
Post a Comment