किल्ले धारूरमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी
किल्ले धारूरमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर: (दिनांक ३ जानेवारी) समाजाच्या समता परिषदेच्या वतीने आज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास राजेंद्रजी सत्वधर, रामचंद्र शेवते सर, सी ए फुटाणे साहेब, ज्येष्ठ माजी नगरसेवक बळवंत दादा सत्वधर, दत्तात्रय गोंदणे, अशोकराव नाईकनवरे, रामेश्वर मनेरी, कृष्णा मनेरी, नाथाराव कापसे, शेषेराव काळे सर, रमेश सत्वधर, डॉ भारत सत्वधर, बालाजी गोंदणे, आण्णा गोन्ने, संतोष सत्वधर, आकाश सत्वधर, महारुद्र गोंदणे, विकास सत्वधर आणि इतर समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची चर्चा करण्यात आली. त्यांच्या समाज सुधारणेतील योगदानाला अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला शिक्षण आणि समाजातील समता या विषयांवरही चर्चा झाली.
समाजाच्या समता परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
Comments
Post a Comment