नाशिक येथे १२ महिलांचा सिताफळ प्रक्रिया उद्योगासाठी अभ्यास दौरा संपन्न



नाशिक येथे १२ महिलांचा सिताफळ प्रक्रिया उद्योगासाठी अभ्यास दौरा संपन्न

( सुर्यकांत जगताप )
सृजन अॅग्रो टेक प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सिताफळ प्रक्रिया उद्योग अंतर्गत १२ महिलांचा अभ्यास दौरा यशस्वीरित्या संपन्न झाला. या दौऱ्याचा मुख्य उद्देश महिलांना शेती आधारित प्रक्रिया उद्योगाविषयी माहिती देणे, नविन तंत्रज्ञान शिकवणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे होता.

या अभ्यास दौऱ्यात, महिलांना नाशिक येथील कृषी विज्ञान केंद्राच्या फळ प्रक्रिया उद्योगाची माहिती मिळाली. यामध्ये अंबा आणि सिताफळ रोपवाटिका, खत व्यवस्थापन आणि टाकावु निविष्ठांपासून तयार होणाऱ्या उर्वरकांबद्दल व्यापक माहिती देण्यात आली. 

तसेच, शेतकरी समूहाने तयार केलेल्या सह्याद्री फार्म येथील प्रक्रिया उद्योगाचा अभ्यास करून, महिलांनी त्यांच्या यशस्वी वाटचालीचा अनुभव घेतला. येथे तयार होणाऱ्या विविध उत्पादने आणि प्रक्रिया समजून घेण्यात आल्या. ज्यूस फर्ममधून मिळणाऱ्या फळांच्या पल्पपासून तयार होणारे ज्यूस आणि आईस्क्रीमची विशेष माहिती देण्यात आली.

महिलांना PMFME अंतर्गत रसिका सह्याद्री एंटरप्राईजेसद्वारे सुरु केलेल्या सोलार ड्रायर भाजीपाला व्यवसायाबद्दल देखील माहिती मिळाली, ज्यामुळे त्यामधील व्यावसायिक संधींचा शोध घेण्यात मदत झाली.

हे सर्व कार्य सेवा इंटरनॅशनल दिल्ली आणि ओरॅकल इंडिया यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले. 

या दौऱ्याबद्दल समन्वयक वैजनाथ इंगोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांना हे अनुभव मिळाल्याने त्या आपल्या स्थानिक समाजात तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनांची गुणवत्ता वाढवण्यास सक्षम होतील.

या अभ्यास दौऱ्यामुळे महिलांच्या विकासासाठी एक नवा मार्ग खुला झाला आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील प्रक्रिया उद्योगास आणखी गती प्राप्त होईल अशी आशा आहे.

Comments

Popular posts from this blog

धारूर न्यायालय परिसरात हाणामारी; पत्रकारावर हल्ला, न्यायालयात खळबळ

अतिक्रमण हटवण्यावरून व्यापारी आणि नगरपरिषदेत मतभेद; रस्ता दुरुस्तीचे काम रखडण्याची शक्यता

श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलची सयाजीराजे पार्कमध्ये धमाल सहल!