आंबेवडगाव न्यू हायस्कूलमध्ये बालिका दिन उत्साहात साजरा
आंबेवडगाव न्यू हायस्कूलमध्ये बालिका दिन उत्साहात साजरा
विठ्ठल वाघमोडे
किल्ले धारूर: (दिनांक ३) तालुक्यातील आंबेवडगाव न्यू हायस्कूलमध्ये आज बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील लहान मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे, कविता आणि नाटक सादर करून सर्वांचे मन जिंकले.
मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले पत्रकार विठ्ठल वाघमोडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची
प्रशंसा करीत मुलींना शिक्षण घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाची चळवळ सुरू करून समाजात क्रांती घडवून आणली.
कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापक आर.बी. सोळंके सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण घटनांची माहिती विद्यार्थिनींना दिली. त्यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या उत्थानासाठी अनेक कामे केली. त्यांनी मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था केली, बालविवाहाला विरोध केला आणि स्त्रियांच्या अधिकारांसाठी लढा दिला.
या कार्यक्रमात महिला व बाल विकास विभागाच्या युनिसेफ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत मुलींना प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोडके मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन रामेश्वर बारगजे सर यांनी केले. यावेळी चिमण गुंडे सर, लहू गव्हाणे, कागदे मॅडम, कुलकर्णी मॅडम, कांबळे सर, अरुण देशमुख, सुरेश देशमुख, परिचार संजय कुलकर्णी आणि जय प्रकाश शिरसाठ यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment