किल्ले धारूरमध्ये संतोष देशमुख हत्येविरुद्ध मोठा कॅन्डल मार्च, न्याय मिळवण्याची मागणी
किल्ले धारूरमध्ये संतोष देशमुख हत्येविरुद्ध मोठा कॅन्डल मार्च, न्याय मिळवण्याची मागणी
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर, दि. 3: मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आज शहरात एक मोठा कॅन्डल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये मुले नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी सहभाग घेतला.
शहरातील धारेश्वर मंदिरातून या कॅन्डल मार्चाला प्रारंभ झाला. नागरिकांनी हातात मेणबत्ती घेऊन शांतपणे मार्च काढला. मार्च मार्गे धारेश्वर मंदिर काशिनाथ चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक स्वर्गीय संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी उपस्थित नागरिकांनी "संतोष देशमुख यांना न्याय द्या", "आरोपींना फाशीची शिक्षा द्या" अशा घोषणा देत सरकारचा निषेध व्यक्त केला. हत्येच्या घटनेनंतून ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे. आरोपींना अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
कॅन्डल मार्चचे महत्त्व:
आजचा कॅन्डल मार्च हा केवळ एक निषेध प्रदर्शन नव्हता, तर न्याय मिळवण्यासाठीचे एक शांतपणे व्यक्त केलेले आवाहन होते. या मार्चाद्वारे नागरिकांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला की, ते न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाहीत.
Comments
Post a Comment