धारूर महादुर्ग किल्ला दर्पण दिन साजरा, बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
किल्ले धारूर ( सुर्यकांत जगताप )
ऐतिहासिक धारूर महादुर्ग किल्ल्यावर सोमवारी व्हाईस ऑफ मीडिया शाखा धारूर संघटनेच्या वतीने दर्पण दिन साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सचिन थोरात यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश काळे, संदीपान तोंडे, सुनील कावळे यांनी जांभेकर यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी अतुल शिनगारे, सूर्यकांत जगताप, अविनाश ठोंबरे, रवी गायसमुद्रे, सुनील तोंडे, गोवर्धन बडे, अतीक मोमीन तसेच किल्ल्याच्या रक्षकापदी असलेले कपिल समर्थ यांची उपस्थिती होती.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही धारूर किल्ला बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना उजाळून देण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. जांभेकर यांच्या कार्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
Comments
Post a Comment