वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडा सुरु
जिजाऊ राजमाता महाविद्यालय किल्ले धारूर वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडा: विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची ओढ वाढली
किल्ले धारूर, ( सुर्यकांत जगताप )
६ जानेवारी २०२५: राजमाता जिजाऊ महाविद्यालयातील उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या निर्देशानुसार महाविद्यालयातील ग्रंथालय व माहिती केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" पंधरवडा दिनांक १ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याला चालना देणे, वाचनाची सवय लागविणे, तसेच विविध विषयांवरील ज्ञानाची भूक भागविणे आहे. या वाचन संकल्प सोहळ्यात विद्यार्थ्यांसाठी आयोजित सामूहिक वाचन उपक्रमात कॉलेजचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्यासह धारूरातील अनेक पत्रकार बंधूंनी उपस्थिती दर्शवली.
सामूहिक वाचन उपक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पत्रकारांमध्ये प्रकाश काळे, अनिल महाजन, अतुल शिनगारे, संदिपान तोंडे, राम शेळके, धनंजय कुलकर्णी, सय्यद शाकेर अली, अतिक मोमीन, सूर्यकांत जगताप, सचिन थोरात, रवी गायसमुद्रे, सुभाष साखरे, दिनेश कापसे आणि सुनील तोंडे यांचा समावेश होता.
यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सच्चिदानंद ढेपे, आयक्यूवएसी समन्वयक डॉ. एल. बी. जाधवर, कार्यालय अधीक्षक श्री. केशव भोंडवे, संयोजक ग्रंथपाल श्री. गोपाळ सगर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विजयकुमार कुंभारे, प्रा. बालासाहेब जोगदंड आणि डॉ. दत्ता जाधव यांची उपस्थिती होती.
या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, ज्यामुळे वाचनाची महत्ता विद्यार्थ्यांमध्ये अधिक प्रमाणात रुजवली जात आहे. "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रमाने शिक्षणाच्या दृष्टीने एक नवा मार्ग दर्शवला असून, विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे दार उघडले आहे.
या उपक्रमाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे महाविद्यालयातील वाचन संस्कृतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Comments
Post a Comment