ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयात किल्ले धारूर दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयात किल्ले धारूर दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
किल्ले धारूर, सुर्यकांत जगताप
6 जानेवारी: किल्ले धारूर तालुक्यातील ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयात आज दर्पण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार श्री. नागनाथजी सोनटक्के होते. यावेळी विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश काळे, सय्यद शाकेर, अनिल महाजन, सूर्यकांत जगताप, दिनेश कापसे, राम शेळके, विष्णू रंदवे, अतुल शिनगारे, सचिन थोरात, सुनील कावळे, संदीपान तोंडे,अतिक मोमीन, सय्यद रहीम, अविनाश ठोंबरे हे पत्रकार बांधव उपस्थित होते.
उपस्थित पत्रकारांनी विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे महत्त्व, समाजातील भूमिका आणि सत्यता याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्साहपूर्वक या कार्यक्रमात सहभाग घेतला.
शालेय शिक्षकवृंदाने या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमामुळे किल्ले धारूर तालुक्यातील पत्रकारितेला एक नवीन ऊर्जा मिळाली आहे.
Comments
Post a Comment