राज्यात 20 लाख घरकुलांचे अनावरण; धारूरमध्येही कार्यक्रम


राज्यात 20 लाख घरकुलांचे अनावरण; धारूरमध्येही कार्यक्रम

पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली, गृहमंत्री शाह यांच्या हस्ते ऑनलाइन अनावरण; उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

सुर्यकांत जगताप

किल्ले धारूर येथे दिनांक 22 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती सभागृहात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली 20 लाख घरकुलांचे अनावरण करण्यात आले. राज्यातील गरीब लोकांसाठी ज्यांच्याकडे घरे नाहीत, त्यांच्यासाठी ही घरे बांधण्यात आली आहेत. पुणे बालेवाडी येथे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे या घरांचे अनावरण करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री महोदय उपस्थित होते. धारूरमधील कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी, गट विकास अधिकारी लोखंडे, पंचायत समिती माजी सभापती हनुमंत बप्पा नागरगोजे, तालुका अध्यक्ष ॲड. बालासाहेब चोले, शहर अध्यक्ष दत्ता भाऊ धोत्रे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष एडव्होकेट मोहन भोसले, विस्तार अधिकारी परमेश्वर राठोड, कांदे, बाबले, सरपंच भागवत शिनगारे, सरपंच नंदकुमार भोसले, सरपंच राजेश सोनवने आणि इतर लाभार्थी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
घरकुल विभागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल डीईओ गोपाल पालवदे, राजाभाऊ बडे, राहुल जाडकर आणि सागर सानप यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

धारूर न्यायालय परिसरात हाणामारी; पत्रकारावर हल्ला, न्यायालयात खळबळ

अतिक्रमण हटवण्यावरून व्यापारी आणि नगरपरिषदेत मतभेद; रस्ता दुरुस्तीचे काम रखडण्याची शक्यता

श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलची सयाजीराजे पार्कमध्ये धमाल सहल!