आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी
आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी
राजमाता जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर: 20 फेब्रुवारी रोजी राजमाता जिजाऊ महाविद्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील पहिले 'दर्पण' वर्तमानपत्र सुरू केले. त्यांच्या योगदानाला आदराने गौरवण्यासाठी दरवर्षी त्यांची जयंती साजरी केली जाते.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, समन्वयक डॉ. एल. बी. जाधवर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विनायक कापावार आणि सदस्य यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment