प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन: सोनीमोहा गावात घरकुल वाटप कार्यक्रम संपन्न
प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन: सोनीमोहा गावात घरकुल वाटप कार्यक्रम संपन्न
सुर्यकांत जगताप
सोनीमोहा (ता. धारूर), दि. 22 फेब्रुवारी: ग्रामपंचायत सोनीमोहा येथे आज प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत घरकुल वाटप मंजूरी आदेश वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात गावातील गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घराची प्रतीक्षा अखेर संपली.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आदर्श मुख्याध्यापक तथा नोडल अधिकारी श्रीराम सिकची सर यांची उपस्थिती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. सरपंच राहुल भैया तोंडे, उपसरपंच सुनीलजी तोंडे आणि सर्व सदस्य यांच्यासह ग्रामसेवक गीते आणि फुटाणे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय भूमिका बजावली.
या घरकुल वाटप कार्यक्रमामुळे अनेक कुटुंबांना त्यांच्या स्वप्नातील घराची प्राप्ती झाली आहे. गावच्या विकासासाठी आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी ग्रामपंचायत नेहमीच तत्पर असते, असे मत सरपंच राहुल भैया तोंडे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. घरकुल मिळाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव दिसून आले.
Comments
Post a Comment