धारूरच्या रस्त्याला अखेर 'अच्छे दिन'!मुख्याधिकारी गायकवाड यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात
धारूरच्या रस्त्याला अखेर 'अच्छे दिन'!
मुख्याधिकारी यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात
व्यापाऱ्यांच्या मागणीला यश, नगरपरिषदेने हाती घेतले रस्ता दुरुस्तीचे काम, अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू
सुर्यकांत जगताप
धारूर शहरातील मेन रोडची दुरवस्था अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनली होती. रस्त्यावरील धुळीमुळे व्यापारी त्रस्त होते आणि रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत होते. अखेर, नगरपरिषदेने त्यांची दखल घेतली असून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे.
परंतु, रस्ता दुरुस्तीपूर्वी रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण हटवणे आवश्यक आहे. नगरपरिषदेने व्यापाऱ्यांना अतिक्रमण हटवण्याची नोटीस बजावली आहे. त्यानुसार काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण हटवले आहे. मात्र, काही व्यापारी संभ्रमात आहेत. त्यांना नेमके किती अतिक्रमण हटवायचे आहे, याची माहिती नाही. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी नगरपरिषदेकडे रस्त्याची हद्द निश्चित करण्याची मागणी केली आहे. हद्द निश्चित झाल्यानंतर अतिक्रमण हटवण्यास मदत होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून नगरपरिषद किल्ले धारूरचे मुख्याधिकारी महेश गायकवाड व त्यांची नगरपरिषदेचे सर्व टीम कर्मचारी सर्व यंत्राच्या साह्याने आज छत्रपती शिवाजी महाराज मुख्य द्वारपासून अतिक्रमण हटवत आहे.
दुकानदार स्वतः आपल्या दुकानासमोरचे अतिक्रमण काढत आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला रस्ता आज पूर्ण श्वास घेऊन काम सुरू होणार आहे. यामुळे धारूर शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. असेच नगर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री महेश गायकवाड यांनी कामाची गती चालू ठेवावी, त्यांच्या पाठीशी धारूर शहरातील व्यापारी व सर्व सामाजिक संघटना व सामाजिक संस्था आणि नागरिक त्यांच्या पाठीशी उभे आहे.
Comments
Post a Comment