धारूरमध्ये पाळीव कुत्र्याचा धुमाकूळ; दोनशेहून अधिक लोकांना चावा
धारूरमध्ये पाळीव कुत्र्याचा धुमाकूळ; दोनशेहून अधिक लोकांना चावा
नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; आंदोलनाचा इशारा
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर शहरामध्ये गेल्या गेल्या अनेक महिन्यांपासून एका पाळीव कुत्र्याने धुमाकूळ घातला असून छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि किल्ले धारूर बस स्थानक परिसरात या कुत्र्याने आतापर्यंत दोनशेहून अधिक लोकांना चावा घेतला आहे. अनेक वर्षांपासून या ठिकाणी पाळलेल्या या कुत्र्यावर मालकाने कोणतीही कारवाई केलेली नाही, तसेच नगरपरिषदेनेही याकडे दुर्लक्ष केले आहे.
या कुत्र्याच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बस स्थानक परिसरात वृद्ध नागरिक, लहान मुले आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांची नागरिक मोठी संख्या असते. कुत्र्याच्या भीतीमुळे नागरिकांना त्रास होत आहे.
या समस्येबाबत नागरिकांनी वेळोवेळी नगरपरिषदेला कळवले, परंतु कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप असून आंदोलनाची चर्चा सुरू आहे.
Comments
Post a Comment