किल्ले धारूर युथ क्लबच्या अध्यक्षपदी दत्ता गोरे उपाध्यक्षपदी बाबा देवडे, तर सचिवपदी तोष्णीवाल यांची निवड
किल्ले धारूर युथ क्लबच्या अध्यक्षपदी दत्ता गोरे उपाध्यक्षपदी बाबा देवडे, तर सचिवपदी तोष्णीवाल यांची निवड
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर (प्रतिनिधी): किल्ले धारूर युथ क्लब या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी दत्ता गोरे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी बाबा देवडे, तर सचिवपदी तोष्णीवाल यांची निवड संस्थेच्या सदस्यांनी एकमताने केली.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संस्थेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार पडली. दिनांक 18 फेब्रुवारी रोजी किल्ले धारूर येथे सर्व सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत मागील वर्षातील संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला, तसेच पुढील वर्षात करायच्या कामांची योजना आखण्यात आली.
या बैठकीमध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष, सदस्य आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्षांनी संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी चांगले कार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच, सर्व सदस्यांच्या सहकार्याने संस्थेला आणखी उंचीवर नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
Comments
Post a Comment